रोड रॉबरीतील चौथा आरोपी स्थागुशाच्या ताब्यात ; आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
वसुली करून मोटरसायकलने परत येणाऱ्या व्यापाऱ्यावर चाकुहल्ला करून लाखोची रोख रक्कम लुटून नेणाऱ्या सोनेरी टोळीचा अवघ्या २४ तासात पर्दाफाश करण्यात पोलीसांना यश आले. रोडरॉबरीच्या या खळबळजनक घटनेत जवळपास सात नव्हे तर ५ लुटारूंचा सहभाग असल्याचे आता स्पष्ट होत चालले आहे. या टोळीतील वडसा , पडसा , आणि पुसद येथून प्रत्येकी १ असे
३ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.त्यांच्याकडून दरोड्यातील अंदाजे ३ लाख २४ हजार रुपये हस्तगत करण्यात आल्याने हे पोलीस यंत्रणेचे मोठे यश मानले जात आहे. आरोपींना न्यायालय हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.मात्र या प्रकरणातील आता चौथा आरोपी पोलिसांनी अटक केल्याने स्थानिक गुन्हे शाखेसह महागाव पोलिसांना आणखी एक यश आले आहे.
यामगील पृष्ठभूमि अशी की,
महागाव येथील किराणा व्यापारी अनिल गंभिरमल शर्मा हे काल बुधवारी (ता.१७) दुपारी ४ वाजता वाईबाजार येथून
वसुली करून मोटरसायकलने परत येत असताना खडका येथे राष्ट्रीय महामार्गावरील फ्लायओव्हर वर पाठलाग करणाऱ्या अज्ञात दरोडेखोरांनी अनिल शर्मा यांची मोटरसायकल अडविली. शर्मा यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून लुटारूंनी पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. शर्मा यांनी प्रतिकार करताच लुटारूंनी धारदार चाकुने प्राणघातक हल्ला करून रक्कम लुटून नेली होती. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिल शर्मा यांना महागाव, पुसद व नंतर नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
दरम्यान प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा, डीवायएसपी आणि पोलीस निरीक्षक यांची स्वतंत्र तीन पथके गठीत करून तपास सुरू केला.आरोपी माहुर व परिसरातील असल्याची त्यांनी माहुर येथूनच पाळत ठेऊन पाठलाग केल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी २४ तासाच्या आत दुपारच्या सुमारास तिघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर आज (ता.२०) दुपारी स्थानिक गुन्हे शाखेने या रोड रॉबरी प्रकारांतील आणखी एक आरोपी पुसद येथून ताब्यात घेतला असल्याची विश्वसनीय माहिती समोर आहे.त्यामुळे आता आरोपींची संख्या चार झाली असून तपासाअंती आरोपी संख्या किती हे स्पष्ट होणार आहे.त्यामुळे या प्रकरणाकडे जिल्ह्यातील व्यापारी वर्गाचे लक्ष आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….