हिवरा येथील एका शेतकऱ्याच्या तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने लावली आग…
हिवरा येथील एका शेतकऱ्याच्या तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने लावली आग…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह अनिल बोम्पीलवार
हिवरा संगम
हिवरा :- येथील शेतकरी श्री सुधीर दादाराव कदम यांनी आपल्या तुरीची गंजी एकत्रित करून ठेवली होती पण काल दिनांक 21चे रात्री गुरू वारला रात्री 9 चे दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने या तीन एकर मधील तुरीच्या गंजीला आग लावली त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वर्षभर शेतात राबून शेतकरी आपल्या पिकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो आणि हातातोंडाशी आलेला घास निसर्ग किंवा नैसर्गिक आपत्ती आणि यासारख्या प्रकरणाने जर नुकसान होत असेल तर शेतकर्याचे मनोबल निश्चितच खचेल. अद्यापपर्यंत या आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. यादरम्यान नुकतेच हिवरा गावातील ग्रामपंचायत ची निवडणूक झाली आहे या घटनेचा या निवडणुकीतील राजकारणाशी काही संबंध आहे का अशी चर्चा मात्र गावात ऐकावयास मिळत आहे . या घटनेची फिर्याद श्री सुधीर कदम यांनी महागाव पोलिस स्टेशनला दिली असून पुढील तपास महागाव पोलीस स्टेशन करत आहे