ब्रेकिंग न्यूज मुख्याधिकारी यांच्यावर लाचखोरी चा गुन्हा दाखल होण्याची शक्यता
पॉलिटिक्स स्पेशल
महागाव नगरपंचायत विभागातील लेखापाल आणि कनिष्ठ लिपिक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. या घटनेला जवळपास ६ तासांचा कालावधी पूर्ण झाला.तरी सुध्धा अजुन महागाव येथील विश्राम गृहावर लाचलुचपत विभागाचे पथक तळ ठोकून आहे. मुख्याधिकारी यांचा समावेश असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली असून याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पथक सखोल प्रकरणाचा तपास करीत आहेत.सध्या स्थितीत रात्री उशिरा पर्यंत या प्रकारांची चौकशी सुरू राहणार असल्याचे बोलल्या जात आहे.वास्तविक पाहता कंत्राटदारा च्या देयक धनादेश यावर १३ तारखेला मुख्याधिकारी यांनी स्वाक्षरी केली.मात्र मुख्याधिकारी यांनी हा धनादेश कंत्राटदाराला दिला का नाही? यामध्ये मुख्याधिकारी यांचा समावेश आहे का? कोणाच्या सांगण्यावरून ५ हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली? अश्या विविध मुद्यांच्या आधारे या लाचाखोरांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती. मुख्याधिकारी यांच्यावर कार्यवाही होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असून लवकरच कार्यवाही पूर्ण होणार असल्याचे ,कार्यवाही नंतर यामध्ये लाचाखोर यांचा आकडा वाढण्याचे संकेत आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….