ग्रा. पं.निवडणूक उमेदवारांना दिलासा : अमानत रक्कम भरलेली पावती ग्राह्य धरणार ; निवडणूक आयोगाचे आदेश ; महागाव तालुक्यातून ५२ नामांकन दाखल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशन पत्रासह भरलेली अमानत रक्कमेची पावती ग्राह्य धरल्या जाणार आहे.याबाबत नुकतेच राज्य निवडणूक आयोगाने आदेश जारी केले आहेत.त्यामुळे पहिल्या टप्प्यातील नामांकन पत्रासह अमानत भरलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.परंतु कोरोणाच्या पार्श्वभुमीवर १७ मार्च २०२० रोजी नामनिर्देशन पत्र छाननीच्या टप्यावर निवडणूक स्थगित करण्यात आली.तर पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकी करिता भरण्यात आलेले नामनिर्देशन अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
निवडणूक आयोगाने पुन्हा सरसकट एप्रिल ते जून (पहिला टप्पा) आणि नोव्हेंबर ते डिसेंबर (दुसरा टप्पा) संयुक्तपणे सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम ११ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात केले.तर पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना नव्याने नामनिर्देशन पत्र भरण्याची संधी मिळाली.मात्र पहिल्या टप्यातील नामनिर्देनपत्र सोबत भरण्यात आलेले अमानत रक्कम बाबत उमेदवारांत संभ्रम कायम होते.त्यामुळे उमेदवार यांनी भरलेल्या अमानत रक्कम बाबत निवडणूक आयोगाने नव्याने आदेश जारी करत पहिल्या टप्यात नामनिर्देशन पत्र सोबत भरण्यात आलेली रक्कम ग्राह्य धरण्यात येईल असे आदेशीत केले आहे.मात्र उमेदवारांना अमानत रकमेची पावती अथवा प्रत नामनिर्देशन पत्रसोबत सादर करावी लागणार असल्याचे आदेशामध्ये निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
महागाव तालुक्यात पहिल्या दिवशी सहा तर दुसऱ्या दिवशी नामांकन दाखल :
महागाव तालुक्यातील ७३ ग्रामपंचायत ची निवडणूक होणार आहे.त्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत पहिल्याच दिवशी ६ नामनिर्देशन पत्र उमेदवारांनी दाखल केले.त्यात फुलसावंगी येथील एक तर काळी दौ. येथील ५ उमेदवारां च्या नामनिर्देशन पत्राचा सामावेश आहे.
तर दुसऱ्या दिवशी तब्बल ४६ नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेत. त्यात काळी दौलत १, मुडाणा १३, फुलसावंगी २, हिवरी ३,आमनी बु ४, वरोडी ६, बेलदारी ६, उटी ८, अंबोडा १, कलगाव २ , उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर केली आहेत.दोन दिवसात असे एकूण ५२ अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती महागाव तालुका निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव इसलकर यांनी दिली आहे.