मुंबईत नाईट क्लबवर पोलिसांचा छापा ; सुरैश रैना , सुझान खानसहित ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
एकूण ३४ जणांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांनी छापा टाकला असता ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावजवळ असणाऱ्या या क्लबमध्ये सुरेश रैना उपस्थित होता. सुरेश रैनासोबत बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनची पत्नी सुझेन खान तसंच इतर काही सेलिब्रेटींवसह एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
मुंबई पोलिसांनी एएनआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “माजी भारतीय क्रिकेटर आणि इतर काही सेलिब्रेटींसोबत एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोनाशी संबधित नियमांचं पालन केल्याने तसंच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे”.

मुंबई पोलिसांकडून क्लबच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान काही जण मागील दरवाजातून पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….