महागाव तालुका हादरला : पुन्हा एका तरुणाने घेतला गळफास # टेंभी (काळी) येथील सलग दुसरी घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :७२४९४४४८८८
महागाव :
महागाव तालुक्यातील काळी (टेंभी) येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (ता.२०) दुपारी अडीच वाजता उघडकिस आली आहे. संदेश दत्तराव वानखेडे(२७) असे मृतकाचे नाव आहे.महागाव तालुक्यातील ही सलग दुसरी घटना असून महागाव तालुका हादरला आहे.
गुरुवारी एका शेतकरी पुत्राने आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याची घटना घडल्याची शाई वाळते न वाळते पुन्हा याच परिसरातील एका उमद्या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याने महागाव तालुका हादरला आहे.गुरुवारी (ता.१९)आत्महत्या करणाऱ्या सूरज नरवाडे आणि आज शुक्रवार ता.(२०) ला आत्महत्या करून जीवन संपविणाऱ्या संदेश हे दोघे जिवलग मित्र असल्याचे समजते.मात्र या दोघांनी आपल्या मरणाला का कवटाळले हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
संदेश करायचा स्पर्धा परीक्षेची तयारी :
संदेशने यवतमाळच्या महाविद्यालय मधून त्याने अभियांत्रिकी ( इलेक्ट्रिक) शिक्षण पूर्ण केले होते. सद्या तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता.मात्र लॉकडाऊन पासून तो सद्या घरी आला होता.शेतातील जवाबदारी पूर्ण करून कुटुंबीयांना मदतही करायचा.

शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात भाऊंची अकरा लाखांची दहीहंडी छम छमा छम
सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..