शेतकरी पुत्राची गळफास घेवून आत्महत्या ; महागाव तालुक्यातील काळी (टें) येथील घटना
शेतकरी पुत्राची गळफास घेवून आत्महत्या ; महागाव तालुक्यातील काळी (टें) येथील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :-
महागाव तालुक्यातील काळी (टेंभी) येथील एका शेतकरी पुत्राने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (ता.१९) सायंकाळी साडेआठ वाजता घडली. सूरज शेषेराव नरवाडे असे मृत शेतकरी पुत्राचे नाव आहे.
काळी टेंभी येथील शेषेराव नरवाडे यांचा एकुलता एक असलेल्या सूरज याने १९ नोव्हेंबरला शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याने समाजमन सुन्न झाले आहे. सूरज हा काही दिवसापूर्वी महागाव शहरातील कृषी केंद्रात खाजगी नोकरी करीत होता.नंतर तो स्वतंत्रपणे एका खाजगी कंपनीचे मागील ६ ते ७ महिन्यापासून कृषी संबंधित बि- बियाणे, औषधी विक्री करून तो आपली दिनचर्या पूर्ण करीत होता.त्याच्या कुटुंबात पाच एकर शेती आहे. मात्र कोणतेही कारण नसताना अचानक त्याने अखेर आपली जीवनयात्रा संपवली असल्याचे प्रथमदर्शी नागरिकांनी सांगितले. त्याच्या पश्चात आईवडील, असा परिवार आहे. गळफास घेवून आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.