सुपरस्टार अल्लू अर्जुन यांची टिपेश्वर अभयारण्याला भेट
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रवी वल्लमवार
पांढरकवडा
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात वाघाचे सहज दर्शन होत असल्यामुळे या अभयारण्याला अनेक नामवंता सह चित्रपट कलावंत सुद्धा भेट देत आहेत. येथे वाघाचा हमखास दर्शन होत असल्यामुळे येथे पर्यटकाची फार मोठी गर्दी होत आहे. ताडोबा अभयारण्यात एखाद्यावेळी वाघाच्या दर्शन होत नाही पण टिपेश्वर अअभयारण्यात वाघाचे दर्शन हमखास होते.
आंध्रप्रदेशातील सुपरस्टार अल्लू अर्जून यांनी टिपेश्वर अभयारण्याला भेट दिली तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकां बातमी कळताच चाहत्यांनी एकच गर्दी केली.
आलू अर्जुन या चित्रपटात अभिनेत्यास पाहण्यासाठी खेड्यातील लोकांनी एकच गर्दी केली. टिपेश्वर अभयारण्य सध्या वाघाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असून येथे पर्यटकाची फार मोठी गर्दी होत आहे.