अलर्ट : ईसापुर धरणातून पैनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
यु.एन. वानखेडे
यवतमाळ व हिंगोली या दोन जिल्ह्याच्या सीमेवर उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापुर धरण आहे हे धरण पेनगंगा नदीच्या स्त्रोतांकडून मुखाकडंच पहिले मोठे धरण आहे .
धरणाची अंतिम सिंचनक्षमता एक लाख सात हजार हेक्टर असून 95 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी घोषित करण्यात आलेले आहे. ईसापुर उजवा कालवा 119 किलोमीटर व डावा कालवा 84 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. या धरणाचे पाणी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड व पुसद तालुक्याला तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत तालुक्याला आणि नांदेड जिल्ह्यातील भोकर, हदगाव, अर्धापूर, मुदखेड या तालुक्याला सिंचनासाठी मिळते. या धरणामुळे यवतमाळ हिंगोली आणि नांदेड या तीनही जिल्ह्याला सिंचनाचे पाणी उपलब्ध होते.प्राप्त माहितीनुसार उर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रकल्प ईसापुर धरणाची पाणीपातळी
14/09/2020 रोजी दुपारी 13.30 वाजता गेट क्रमांक- 6 व 10 हे 2 दरवाजे 50 सेंटीमीटर उघडण्यात आली असून सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या सांडव्याची 7 वक्रद्वारे (क्र.2,6,7,8,9,10 व 14) 50 सेमी ने उघडण्यात आली असून पैनगंगा नदीपात्रात 336.382 कुमेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे धारण पाणी पातळी 99.10%
धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.
तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.
असे ईसापुर धरण पुरनियंत्रण कक्ष यांनी कळविले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असल्यामुळे तसेच धरण क्षेत्रात पाण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे नदीकाठच्या गावाने दक्षता घ्यावी.