दिलीप बिल्डकॉन कंपनीने तहसीलदाराच्या पत्राला दाखवली केराची टोपली
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिवरा
अनिल बोम्पिलवार
मो – ९५५२२६६०९८
दिलीप बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 चे काम चालू आहे. काम करत असताना महामार्गाच्या मार्गावर शेतशिवारात जाणाऱ्या पांदन रस्त्याची मात्र प्रचंड प्रमाणात दुर्दशा झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील हिवरा संगम येथील मुस्लिम कब्रस्तान जवळील 332 क्रमांकाच्या पॉईंट जवळील पांदण रस्त्यात महामार्गावरील पाणी प्रचंड प्रमाणात साचत असल्याने रस्ता अक्षरशा बंद झाला आहे. या महामार्गालगत नालीचे बांधकाम काम करून हे पाणी पांदण रस्त्यात न येऊ देता बाहेर काढणे अपेक्षित आहे. महामार्गावरील या पाण्यामुळे पांदण रस्त्या सोबतच शेती खरडून जाण्याचे सुद्धा प्रकार होत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे . याविषयी संबंधित शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरुद्ध दिनांक 12 ऑगस्टला लेखी तक्रार केली. त्या अनुषंगाने तहसील प्रशासनाने दिनांक 17 ऑगस्ट ला या कंपनीला लेखी कळूऊन तात्काळ कारवाई करून सदर कारवाईचा अहवाल कार्यालयात सादर करावा असे सांगितले. पण गेल्या एक महिन्यापासून या कंपनीने कोणतीही याविषयी कारवाई केली नसून अजूनही तेथील परिस्थिती जैसे आहे तशीच आहे. संबंधित कंपनीने शेतकऱ्यांची होणारी ही अडचण लक्षात घेता त्वरित येथील काम करावे अशी रास्त मागणी तहसीलदार यांना दिलेल्या तक्रारीत शेतकऱ्यांनी केली आहे.

महामार्गालगत असलेला पांदन रस्ता…

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..