बुलडाणा शहरात एकाच दिवशी दोन मृतदेह आढळले
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
दिनेश मुडे 9763125072
बुलडाणा :
बुलडाणा शहरात आज 30 ऑगस्ट रोजी 2 मृतदेह आढळून आले. पहिला मृतदेह जिजामाता नगर मधील नगर परिषदेच्या गाळा क्र 15 समोर 25 वर्षीय युवकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सकाळी 6 वाजता येथील नागरिकांना दिसून आला. तर दुसरा मृतदेह जांभरून रोड वरील डॉ जे. बी. राजपूत यांच्या दवाखाण्यासमोर दिसून आला आहे. या घटनेमुळे शहरात एकाच खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटना आत्महत्या की घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शांत शहर म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा शहरातील जिजामाता नगरातील नगर पालीका व्यापारी संकुलाच्या आवारात एका २५ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना आज ३० ऑगस्ट रोजी पहाटे साडे सहाला उघडकीस आली आहे. तेजस दिनकर देशमूख असे मृतकाचे नाव आहे.

या घटनेने एकच खळबळ उडाली असून हा घातपात आहे की आत्महत्या? याचे नेमके कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे. तर दुसरी घटना बुलडाणा तालुक्यातील ग्राम अजिसपुर येथील रहिवासी सुरेश मुरलीधर महामुने वय 48 असे मृतक मजूराचे नाव आहे. तो बुलडाण्यात येऊन हात मजुरी करत होता तसेच मिळेल त्या ठिकाणी खातपित होता व सुरेशला दारुचे व्यसन असल्याचे त्याचे लहान भाऊ संजय महामूने यांनी सांगितले. त्याला ४ मुली असून ३ मुलींचे लग्न देखील झाले आहेत.आज सकाळी येथील जांभरुण मार्गावरील राऊत कॉम्पलेक्स समोर डॉ. जे.बी. राजपूत यांच्या दवाखान्यासमोर तो मृतावस्थेत आढळून आला याची माहिती बुलडाणा शहर पोलीसाना देण्यात आली असता, शहर पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल होऊन एएसआय आप्पा राव गवई, प्रशांत मोरे, छबू पांडव यांनी मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….