फार्म हाउस वर दरोडा ; चाकूचा धाक दाखवून सोने लुटले ; बिटरगाव पो. स्टे. हद्दीतील घटना ; एक गंभीर जखमी ; अज्ञातावर दरोड्याचा गुन्हा दाखल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खरुस रोड वरील संजय जिल्लावार यांच्या शेतात काल (ता.२९) रोजी रात्री च्या सुमारास अंदाजे दहा ते पंधरा जणांच्या गुंडाच्या टोळीने शेतातील घरावर ( फार्म हाऊस) वर दरोड्या च्या उद्देशाने आले. शेतात असलेल्या सालगडी तेव्हा जेवणाच्या तयारीत होते. घरात प्रवेश करून त्यांनी “सोने कोठे आहे, सांग नाहीतर मारून टाकतो ” असे म्हणून चाकूचा धाक दाखवून मारहाण केली व प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात सालगडी गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसाच्या प्राप्त माहितीनुसार , शेतगडी नागोराव वामन डहाके (२८) हे मागील काही दिवसा पासून संजय जिल्लावार यांच्या शेतात रोज मंजुरीने आपल्या परिवारासह राहतात. कुटुंबासह जेवण करत असताना दहा ते पंधरा अज्ञात व्यक्ती घेऊन घरात प्रवेश केला .चाकूचा धाक दाखवून सोन्याची विचारणा केली. सलगड्याने प्रतिउत्तर न दिल्याने गुंडांनी साल गड्यावर चाकूने पायावर, डोक्यावर, आणि मांडीवर सपासप वार केले. तसेच शेतातील दुसऱ्या सालगड्याने गुंडांना प्रतिकार करत असल्याने त्या गड्या ला विहरीत फेकून दिले. मात्र त्यास पोहता येत असल्याने देवबळवत्तर जीवितहानी टळली आहे. मात्र गुंडांनी शेतातील मजुरांच्या पत्नीच्या अंगावरील कानातील सोन्याचे फुल, व मंगळसूत्र( अंदाजित किंमत २० हजार) घेवून मजुरांना बांधून ठेवले.आणि गोठ्यात कडबा बाहेर काढून काही मिळते का याची पाहणी केली मात्र गुंडाच्या हाती काहीच न लागल्याने त्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला.
रात्री दहा च्या सुमारास शेत मालक संजय जिल्लावार हे शेतात आल्या नंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनी तात्काळ बिटरगाव पोलीस स्टेशनंला ही माहिती दिली. माहिती मिळतात ठाणेदार विजय चव्हाण व उपनिरीक्षक रामकिसन जायभाये यांनी घटना स्थळ गाठले व व आज सकाळी श्वान पथकाला बोलवण्यात आले. पोलीस स्टेशनं बिटरगांव ला नागोराव डहाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींवर कलम ३९५,३०७,३२३,५०६ 307, भादंवि गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास उमरखेड पोलीस उपविभागीय अधिकारी मुक्तार बागवान यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विजय चव्हाण, उपनिरीक्षक रामकिसन जायभाये, रवी गिते, गजानन खरात, संदीप राठोड, सतीश चव्हाण, शेळके, निलेश भालेराव हे करत आहेत.