नॅचरल शुगर कारखाना विक्रीस थांबविण्यासाठी ; ३१ ऑगस्ट रोजी कारखाना साईटवर शेतकऱ्यांची विचार सभा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरू पाहणारा नॅचरल शुगर युनिट २ हा साखर कारखाना विक्रीस काढण्यात आल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.साखर कारखाना विक्रीस विरोध करण्यासाठी सोमवार ता. ३१ ऑगस्ट रोजी कारखाना साईटवर शेतकऱ्यांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.ऊस उत्पादकांच्या आंदोलनात सातत्याने पुढाकार घेणारे शेतकरी नेते गोविंदराव देशमुख सवनेकर यांनी या सभेसाठी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.