महागाव न. पं. मुख्याधिकारी यांना कोरोनाची लागण ; तालुक्याचा कोरोना बाधित आकडा ११८ ; तर ४८ अॅक्टीव्ह रुग्ण
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह :
महागाव :
नगरपंचायत कार्यालयात कार्यरत असलेल्या मुख्याधिकारी यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,
नगरपंचायत मुख्याधिकारी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी महागाव येथील कोविड सेंटरला स्वतःहुन कोरोना चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला.त्यांची रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे महागाव तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा १ ने वाढला आहे. महागाव तालुक्यातील कोरोनाबाधित आकडा ११८ वर पोहचला आहे. त्यात ग्रामीण भागातील ९२ तर महागाव शहरातील २६ कोरोना बाधित रुणांचा सामावेश आहे. सधास्थितीत अॅक्टीव पॉझिटिव्ह ४८ असून महागाव शहरातील २ तर ग्रामीण भागातील ४६ रुग्ण कोरोना अॅक्टीव्ह आहेत. त्यांच्यावर उपाचार सुरु असुन उर्वरित रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जब्बार पठाण यांनी दिली आहे.