महागाव शहरात आज नव्याने पुन्हा दोन पॉझिटिव्ह रुग्णांची भर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव ( o८ ऑगस्ट) :
तहसील कार्यालय मध्ये सुरू असलेल्या रॅपिड एंटीजन किट द्वारे तपासणी मोहिमेत तपासणीदरम्यान एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महागाव शहरात खळबळ उडाली आहे. महागाव शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दोन ने भर पडली असून पॉझिटिव्ह रुग्ण संख्या २२ वर पोहोचली आहे . सदर कोरोना बाधित रुग्ण हे प्रभाग क्रमांक ९ मधील रहवासी असून एकाच कुटुंबातील आहेत.

महागाव शहरातील दुकानदार , दुकानातील कामगार, सर्व विभागातील कर्मचारी,अधिकारी,पत्रकार यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन तहसिल व आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले होते.त्यानुसार तहसील कार्यालयात तहसीलदार निलेश मडके,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जब्बार पठाण , यांच्या मार्गदर्शाखाली कोरोना चाचणी मोहीम सुरू करण्यात आली.त्यानुसार नागरिकांनी प्रतिसाद देत आरोग्य विभागाने दुपारी २ वाजेपर्यंत ३४५ नागरिकांची तपासणी केली .त्यात आज दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.त्यात एक महिला व एक पुरुषाचा समावेश आहे. सध्या स्थिती आज दुपारपर्यंत दोन पॉझिटिव्ह रुग्ण आला असून कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णाच्या निकटवर्तीय संपर्कात असलेले रुग्णांची तपासणी सद्यस्थितीत तहसील कार्यालयामध्ये सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जब्बार पठाण यांनी दिली आहे.
सद्यस्थितीत महागाव तालुक्यात कोरूना बाधित आकडा २२ झाला आहे.त्यात एक मृत्यू,१५ जण कोरोना मुक्त,तर६ अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत.
डॉ. जब्बार पठाण
तालुका आरोग्य अधिकारी
महागाव ..

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….