महागाव तालुक्यात खळबळ : शिरपूर गावातील त्या कोरोना बधितांच्या संपर्कातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह # महागाव तालुक्यात चा आकडा पोहोचला २० वर ; ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह ४
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव
तालुक्यातील गुंज जवळ असलेल्या शिरपूर गावातील एका पुरुष व्यक्तीला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.याबाबत तालुका आरोग्य प्रशासनाला माहिती मिळताच त्यांनी कोरोना बाधित व्यक्तीच्या निकटवर्तीय संपर्कातील संशयित नागरिकांची रॅपिड एंटीजन किटद्वारे तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार निकटवर्तीय संपर्कात असलेल्या ९४ संशयिताचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आले होते. त्यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोरोना मुक्तीच्या दिशेने असलेल्या महागाव तालुक्यात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे. आजाराने त्रस्त असलेल्या शिरपूर येथील एका पुरुषाला अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सदर रुग्णालयात उपचारापूर्वी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आल्याने अकोला येथील प्रशासनाने महागाव येथील प्रशासनाशी संपर्क साधून सदर रुग्णाची माहिती दिली.त्यानुसार तालुका आरोग्य विभागाने सतर्कता बाळगून संबंधित कोरोना बाधित रुग्णाच्या निकटवर्तीय संपर्कातील म्हणजेच हाय- रिस्क कॉन्टॅक्ट मधील संशयितांची रॅपिड एंटीजन किटद्वारे तपासणी मोहीम शिरपूर गावात घेतली. त्यातच ९४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव आल्याने महागाव तालुक्यातील कोरोना बाधित संख्येत वाढ झाली आहे.महागाव तालुक्यातील कोरोना बाधितांचे आकडा २० वर जाऊन पोहोचला आहे.त्यात एक मृत्यू ,१५ जणांनी कोरोनावर मात केल्याने ते घरी परतले आहे.सध्या स्थितीत ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह संख्या ही चार असून चारही रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे तालुका आरोग्य विभागाने कळवले आहे.
२७ जुलै रोजी महागाव शहरातील प्रभाग २ आणि १७ मधील पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.त्यामुळे त्यांना कोविड सेंटर मधून आज (ता.७) सुट्टी देण्यात आली आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जब्बार पठाण यांनी दिली आहे.