खा.नवनीत राणा यांनी शेतकऱ्याच्या शेतात केली पेरणी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील एका शेतात जाऊन शेतकऱ्यांना पेरणी करण्यास मदत केली आहे. शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्याचा सत्कार करत कमरेला ओटी बांधून सरत्यावर सोयाबिन बियांची रास सोडली. तर हो बैला म्हणून आवाज देत त्यांनी बैलजोडी सुद्धा हाकली आहे. दरम्यान खासदार नवनीत राणा स्वतः शेतकऱ्याच्या शेतात पेरणी करत असल्याचं पाहून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जूनचा महिना असल्यानं शेतकऱ्याची सध्या पेरणीची लगबग आहे. राज्यातील शेतकरी आता संकटात असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी शेतकऱ्यांचा सन्मान करत आहे असे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.यावेळी त्यांनी शेतमजूर महिला व शेतकऱ्यांसोबत शेतात काही वेळ पेरणी केली.