शरद पवारांचं आमंत्रण म्हणजे लबाडाघरचं जेवण, जेवल्याशिवाय काही खरं नाही” सदाभाऊ खोत
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या आमदारकीची खुली ऑफर देण्यात आली आहे. तसंच त्यासंबंधीच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. यावरच बोलताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी आणि शरद पवार यांना टोला लगावला आहे.
राजू शेट्टी यांनी आमदार व्हावं अशी शरद पवारांची इच्छा आहे पण शरद पवारांचं आमंत्रण म्हणजे लबाडाघरचं जेवणं आहे. जेवल्याशिवाय काही खरं नाही, असा उपहासात्मक टोला सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लगावला आहे. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाविकास आघाडीने राजू शेट्टी यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करावी. मी स्वतः त्यांना पाठींबा देईन आणि मी त्यांची जंगी मिरवणूक देखील काढेन, असं आव्हान सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीला दिलं आहेदरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टींच्या घरी जाऊन त्यांच्याशी आमदारकीबाबत चर्चा केली आहे. मात्र माझं शरद पवार यांच्याशी याविषयावर अद्याप बोलणं झालेलं नाहीये. लवकरच मी त्यांच्याशी बोलने तसंच आमच्या पक्षातील लोकांशी देखील बोलेन आणि त्यानंतर आमचा निर्णय आम्ही जाहीर करू, असं शेट्टी यांनी सांगितलं आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….