पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- “पुण्यात भाजप आणिएकनाथशिंदेंच्या शिवसेनेची युती कधी होणार आणि जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार, सोबतच उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार? या सर्व प्रश्नां कडे लक्ष लागलं य . असे असताना भाजपने मात्र काही ठराविक उमेदवारांना मध्यरात्री एबी फॉर्म दिले आणि उमेदवारांना प्रचार सुरू करायला सांगितलं आहे.
दरम्यान, पुण्यात भाजपने (Pune Bjp)165 पैकी 100 जागा निश्चित केल्या होत्या. ताशी यादी तयार केली होती. आता त्याच यादीतील 60-80 उमेदवारांना भाजपने एबी फॉर्म दिले आहेत. एकीकडे भाजप-शिवसेनेच्या युती बाबत शंका असताना, जागावाटावरून तडजोडी सुरू असताना भाजप आपला सेफगेम खेळून पक्क्या उमेदवारांना प्रचारासाठी मोकळीककरूनदिली आहे.
भाजपाचा पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज आज होणार दाखल
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आज शहरातील पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. प्रभाग क्रमांक 24 मधील उमेदवार आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांचा अर्ज आज दाखल होणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने आणि शहराध्यक्ष धीरजजी घाटे उपस्थित राहणार आहेत.
महापालिका निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026
अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026
मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026
मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….
भाजपासोबत असलेल्या अजित पवारांसोबत शरद पवार का जातायेत हे त्यांनी सांगावं ; राऊतांची टीका….