महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महानगरपालिका निवडणुकी अगोदर सोलापुरात मोठ्या राजकीय घडामोडी होत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना अन् उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे एमआयएम नेते काय भूमिका घेणार? असे लक्ष लागले आहे. एमआयएम राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार अशी चर्चा होती. मात्र एमआयएमचे शहर अध्यक्ष फारुक शाब्दी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शहर अध्यक्षकांनीच राजीनामा दिल्याने एमआयएमचे सर्व इच्छुक नगरसेवक संभ्रमात पडले आहेत.
एमआयएम पक्षाला सावरत जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी भूमिका मांडली आहे. कुणाच्या राजीनाम्याने पार्टीचे कामकाज बंद होत नाही. आणखीन जोमात लढू, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी हे काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात होते, असं आमच्या कानावर आले होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
एमआयएमची शहरात मोठी ताकद
2017 साली सोलापूर महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत एमआयएमचे 9 नगरसेवक निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत एमआयएम मोठा धमाका करणार असे चित्र होते. मात्र अचानकपणे मुंबई आणि सोलापूर शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन एमआयएम पक्षाला गोत्यात आणले आहे. 2019 पासून एमआयएम पक्षाचं संघटन मजबूत करणाऱ्या शहर अध्यक्षकांनीच रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास राजीनामा दिल्याने कार्यकर्त्यांनी फारूक शाब्दीच्या समर्थनार्थ हॉटेल लोटस समोर जोरदार घोषणाबाजी केली आहे.
जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. कुणाच्या राजीनाम्याने एमआयएम पार्टी थांबणार नाही. उलट आम्ही 20 नगरसेवक निवडून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता आणखीन जोमाने लढू आणि जवळपास 30 ते 40 नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेत एमआयएमचे पाठवू, असा आत्मविश्वास त्यांनी दाखवला आहे. तसेच फारूक शाब्दी हे राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेत्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत जाऊ शकतात, असा अंदाज वर्तविला आहे. हैदराबादहून आलेले एमआयएम नेते अन्वर सादाद यांनी फोन वरून प्रतिक्रिया देताना सांगितलं की, त्यांनी राजीनामा दिलाय. मात्र आम्ही अजून मंजूर केला नाही. पक्षाचे वरीष्ठ नेते ठरवतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….
भाजपासोबत असलेल्या अजित पवारांसोबत शरद पवार का जातायेत हे त्यांनी सांगावं ; राऊतांची टीका….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..