शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी युती, आघाड्यांची चर्चा अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत. बहुतेक पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी याद्या जाहीर न करता थेट उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची भूमिका घेतली आहे.
त्यामुळे इच्छूक संभ्रमात आहेत. युती-आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती, कुठल्या जागा मिळाल्या, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यातच पदाधिकाऱ्यांची नाराजी समोर येऊ लागली असून मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई जिल्हाध्यक्षा राखी जाधव या जागावाटपावरून नाराज असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीने ठाकरे बंधूंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या युतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ ५ ते १० जागा मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असल्याचे समजते.
राखी जाधव या इच्छूक असलेल्या मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळाली असली तरी इतर इच्छूकांची नाराजी समोर आली आहे. त्यातूनच जाधव यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्या आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांना भाजपकडून घाटकोपरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
राखी जाधव यांच्याकडून पक्षाला किमान ३० जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जात होते. पण प्रत्यक्ष अत्यंत कमी जागा वाट्याला येताना दिसत आहेत. त्यातून अनेक इच्छूकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळेही जाधव नाराज होत्या. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून जागावाटपात ठाम भूमिका घेतली नाही, असे त्यांचे म्हणणे असल्याचे सुत्रांनी सांगितले.
शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबईत राखी जाधव या त्यांच्या पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून समोर आल्या होता. जागावाटपातही त्यांची भूमिका महत्वाची होती. पण त्याच पक्ष सोडणार असल्याने राष्ट्रवादीची ताकद आणखी कमी होणार आहे. पक्षफुटीनंतर आधीच शरद पवारांची राष्ट्रवादी कमकुवत झाली होती. जाधव यांच्यासारखे मोजकेच पदाधिकारी वगळता मुंबईत पक्षाला फारसा आधार नाही. आता हे नेतेही सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….
भाजपासोबत असलेल्या अजित पवारांसोबत शरद पवार का जातायेत हे त्यांनी सांगावं ; राऊतांची टीका….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….