सुशांतचा शेवटचा कॉल न उचलणाऱ्या ‘त्या’ दोघांची पोलीस करणार चौकशी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अल्पावधीतच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अजोड कलागुणांच्या जोरावर एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता ‘सुशांत सिंह राजपूत’ ने आपला जीवनप्रवास थांबवला. मुंबईतील आपल्या निवासस्थानी त्याने गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतची ही अकाली एक्झिट सर्वांच्याच जीवाला घोर लावणारी ठरली असून सुशांत आपल्यातून निघून गेला आहे हे सत्य पचवणं जड जातंय.
त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत. त्याच्या फोन चे कॉल रेकॉर्ड काढले असून त्यात त्याने शेवटचा कॉल रिया चक्रवर्ती आणि महेश शेट्टी यांना केला होता. परंतु त्या दोघांनीही सुशांतचा कॉल उचलला नव्हता. यामागे नक्की कारण काय आहे यासाठी पोलीस त्या दोघांची आता चौकशी करणार आहेत.सुशांतने १३ जून ला रात्री १२ वाजल्यानंतर त्या दोघांना कॉल केले होते. त्या दोघांसोबतचं सुशांच्या इतरही मित्रांची चौकशी केली जाणार आहे पोस्टमार्टम रिपोर्टनुसार सुशांतचा मृत्यू फाशी लागून गुदमरल्यामुळे झाला असल्याचं समोर आलं आहेरिया चक्रवर्ती ही एक सुप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. सुशांतसोबत तिच्या अफेअरचीही चर्चा झाली होती. ते दोघेही काही दिवसांपूर्वी सुट्टीवर गेले होते. तसेच महेश शेट्टी याने देखील सुशांतबरोबर पवित्र रिश्ता या मालिकेत काम केले होते.