धक्कादायक : यवतमाळ जिल्ह्यात आज तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु तर ‘पाझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : दोघांना डिस्चार्ज
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
यवतमाळ :
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंताजनक आहे. सोमवारी तीन जणांच्या मृत्युची नोंद झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत मृत्युचा आकडा सहा झाला आहे. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले दोन जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
सोमवारी मृत्यु झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि एक महिला आहे. यात पुसद येथील 60 वर्षीय आणि दारव्हा येथील 45 वर्षीय पुरुष तर दारव्हा येथील 66 वर्षीय महिलेचा समावेश आहे. मृत्यु झालेल्या तिघांनाही सारीची लक्षणेसुध्दा होती. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सद्यस्थितीत 32 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 39 जण भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 184 वर गेली असून यापैकी 146 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.
रेड झोनमधून आलेल्या नागरिकांनी स्थानिकांच्या संपर्कात येऊ नये. तसेच स्थानिक लोकांनीसुध्दा आपल्या गावात आलेल्या लोकांबद्दल तात्काळ तालुकास्तरीय समितीला कळवावे. नागरिकांनी अनावश्यकपणे बाहेर पडून गर्दी करू नये. या विषाणुच्या संसर्गाची मानवी साखळी तोडण्यासाठी घरातच सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडलो तर मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
००००००००

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….