खळबळ : पुसद येथील “त्या” कोरोनाबाधिताचा मृत्यू ; तर जिल्ह्यातील चौथा बळी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद / यवतमाळ
पुसद येथील गडी वॉर्डातील एका इसमास कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याने त्याला यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .दरम्यान त्याचा दोन दिवसापूर्वी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुसदमध्ये कोरोनाचा प्रवेश झाल्याचे स्पष्ट झाले. गडी वार्डातील इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानेयवतमाळ जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत भर पडली होती.
त्याच्यावर दोन दिवसापासून उपचार करण्यात येत होते.मात्र कोरोना बाधित इसमाची उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हती.
मिळालेल्या माहिती नुसार कोरोना बाधित इसमाच्या छातीत आज सकाळी साडेसहाच्या सुमारास दुःखु लागले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्यांचा सकाळी १० च्या सुमारास दर्दैवी मृत्यू झाला झाल्याने पुसद तालुक्यातील अधिक खळबळ उडाली आहे. हा यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना चा चौथा बळी ठरला आहे.