लोकसभेसाठी अर्ज भरल्यानंतर संजय गायकवाड यांना मुख्यमंत्र्यांच्या फोन , म्हणाले , पक्षाने “एबी” फॉर्म मला द्यावे…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाणा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना डावलून संजय गायकवाड यांनी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला फोन केल्याचं आमदार गायकवाड यांनी सांगितलं.
शिवसेनेकडून उमेदवारांची नावं जाहीर झालेली नसताना संजय गायकवाड यांनी अर्ज का दाखल केला, असा प्रश्न उपस्थित होतोय. गायकवाड यांनी दोन अर्ज भरल्याची माहिती येतेय. एक अपक्ष आणि दुसरा पक्षाकडून. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार गायकवाड म्हणाले की, मी लोकसभेसाठी अर्ज भरला त्याचं कारण आपणही लढलं पाहिजे, असं मला वाटत आहे. शिवाय कार्यकर्ते आणि जिल्हावासियांच्या त्याच भावना आहेत. अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचंही संजय गायकवाड म्हणाले.
अर्ज भरण्याचा आदेश मुंबईतून होता का? असा प्रश्न संजय गायकवाडांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, तसं काही नाही. तसा आदेश नव्हता. मी अर्ज भरल्यानंतर साहेबांचा मला फोन आला आणि अर्ज भरल्याबद्दल विचारलं. याबाबत एकनाथ शिंदे यांची संमती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय माघार घेण्याबाबत विचार केला नाही, असही संजय गायकवाड म्हणाले.
शिवसेनेच्या उमेदवारांची यादी अजून जाहीर झालेली नाही. त्यापूर्वीच विजय शिवतारे, बच्चू कडू, आनंदराव अडसूळ यांच्या कुरबुरी सुरु आहेत. यातच आता बुलडाण्याच्या संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना हा स्वपक्षातून झटका समजला जातोय.

राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर….
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी….
आता TMC मध्येच मोठा खेला..! उभी फूट पडणार..? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान….
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी..?
नाईक कुटुंबियांचा 20 ते 25 कोटी रुपयांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…
सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी., सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य….