राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी राज्यातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांमध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषद येथील संपूर्ण निवडणुकीसह अनेक ठिकाणच्या पोटनिवडणुकांचा समावेश आहे.
पातूर नगरपरिषदेत अध्यक्षपदासह २० सदस्य पदांसाठी निवडणूक होणार आहे. तसेच उमेदवारांच्या निधनामुळे स्थगित झालेल्या मनमाड, पिंपळनेर, गेवराई आणि अकोट येथील प्रत्येकी एका प्रभागासाठीही मतदान होणार आहे.
याशिवाय ११ जिल्ह्यांतील १४ नगरपंचायतींमधील १५ रिक्त जागा आणि ३ नगरपरिषदांमधील ३ जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. एकूण १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा आणि १४ नगरपंचायतींमधील ४७ रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
निवडणूक वेळापत्रक
निवडणूक कार्यक्रम जाहीर – १२ मे २०२६
उमेदवारी अर्ज दाखल – १८ मे ते २५ मे
अर्ज छाननी – २६ मे
अर्ज मागे घेण्याची मुदत – २७ मे ते २ जून
मतदान – २० जून (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०)
मतमोजणी आणि निकाल – २१ जून
या निवडणुकांमुळे संबंधित भागांतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून स्थानिक पातळीवर तयारीला वेग आला आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….