आता TMC मध्येच मोठा खेला..! उभी फूट पडणार..? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोलकाता :- “यशाचे अनेक वाटेकरी असतात पण पराभवाचा वाटा कोणी उचलत नाही. हा मानवी स्वभाव आहे. सलग तीन वेळा मुख्यमंत्री असलेल्या आणि 1981 पासून राजकारणात मोठी भूमिका निभावणाऱ्या ममता दीदींनी आता हीच भीती सतावत आहे.
ममता दीदींनी विधानसभा निवडणुकीतील पराभव काही मान्य नाही. त्यांनी पराभवाचे खापर केंद्रीय निवडणूक आयोगासह भाजपवर फोडले आहे. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी इंडिया ब्लॉकशी संपर्क केला आहे. त्याचवेळी त्यांच्यासमोर पक्ष एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. काही वृत्तानुसार, पक्षातील काही नेते नाराज आहेत. तर भाजपही मोठी खेळी खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कदाचित पश्चिम बंगालमधून राजकीय भूकंपाची मोठी बातमी येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दिग्गज नेत्यांच्या पराभवाने पक्ष खचला
ममता बॅनर्जी या लढवय्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष काढून त्याला मुख्य प्रवाहात आणले. तर इंडिया आघाडीतही त्यांचे खणखणीत नाणे वाजते. पण यंदा चौथ्यांदा करिष्मा करण्याचा प्रयत्न त्यांना जमला नाही. टीएमसीला विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. भाजपने येथे 200 हून अधिक जागा मिळवल्या. टीएमसीचे दिग्गज चेहेर चंद्रिमा भट्टाचार्य, शशी पांजा, अरूप बिस्वास, सुजीत बोस आणि ब्रात्य बसू ही दिग्गज मंडळी प्रवाहबाहेर फेकल्या गेली. त्यांना मतदारसंघ वाचवता आला नाही. निकाल आल्यानंतर ममता दीदींनी बुधवारी सर्व आमदारांची त्यांच्या कोलकत्त्यातील घरी बैठक बोलावली होती. पण त्यांच्या जवळचे 10 आमदारांनी या बैठकीला दांडी मारली. त्यामागे वेगळी कारणं असली तर पक्षात सर्वच अलबेल नसल्याचे समोर आले आहे.
पक्ष एकजुटीसाठी ममता मैदानात
एका ज्येष्ठ टीएमसी नेत्याने दावा केला आहे की ममता बॅनर्जी यांच्या बैठकीला काही आमदारांनी दांडी मारली. कारण त्यांच्या मतदारसंघात निकालानंतर हिंसाचार उसळला होता. त्यांनी स्थानिक पातळीवरच थांबण्याचे ठरवले. तर काहींनी वैयक्तिक कारणं देत उपस्थिती लावली नाही. टीएमसी पक्ष एकजुटतेसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना पराभवानंतर काय काय होऊ शकते याचा अंदाज आल्याचे मत या नेत्याने व्यक्त केले आहे. त्यामुळे काही राजकीय शक्ती टीएमसी फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
कुचबिहार, फरक्कामध्ये TMC मध्ये वाद
कुचबिहार येथील पक्षाचे वरिष्ठ नेते रवींद्रनाथ घोष यांनी त्यांच्या पराभवासाठी पक्षाचे दुसरे नेते उदयन गुहा यांच्यावर आरोप केला आहे. त्यांनी पक्षासाठी नाही तर भाजपसाठी काम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उदयन गुहा यांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली.
तर दुसरीकडे फरक्का येथील माजी आमदार मोनिरुल इस्लाम यांना तिकीट नाकारण्यात आले. तेही नाराज आहेत. आमचा आपमान करण्यात आला. त्याची फळ आता पक्षाला भोगावी लागत असल्याचा दावा इस्लाम यांनी केला. तर काही इतर नेतेही उघडपणे पक्षाविरोधात बोलत असल्याने टीएमसीमध्ये कोण खेला करणार याची चर्चा होत आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….