राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी राज्यसभेवर वर्णी लागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची रस्सीखेच लागली.
माजी खासदार आनंद परांजपे, सुबोध मोहिते, शिवाजीराव आढळराव पाटील आणि विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले संजय पाटील यासाठी इच्छुक आहेत. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सुद्धा स्पर्धेत आहेत.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर जाण्यासाठी पक्षात अनेक जण प्रयत्नशील आहेत. पक्षातील एका ज्येष्ठ युवा नेत्याचा अविनाश आदिक आणि विक्रम काकडे यांच्या नावासाठी आग्रह आहे.
पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे गेले अनेक दिवस संसदेत जाण्यासाठी उत्सुक आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ हे इच्छुक होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपामध्ये नाशिकची जागा शिवसेनेला देण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी या जागेसाठी फारच आग्रह धरल्याने अखेर भुजबळ यांनी माघार घेतली होती.
त्यानंतर राज्यसभेवर जाण्यासाठी ऐन वेळी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केल्याने भुजबळ यांना माघार घ्यावी लागली. मात्र, आता छगन भुजबळ या जागेसाठी अडून बसले आहेत. खासदार होण्यासाठी मंत्रिपदावर पाणी सोडण्याची त्यांची तयारी आहे. मात्र नाशिकमधील विधानसभेच्या जागेवर पुतणे समीर भुजबळ यांना पाठविण्याचे भुजबळ यांचे प्रयत्न असणार आहेत.
पक्षातील अन्य पदे कधी भरणार?
पक्षातील अन्य पदे रिक्त असल्याने ती भरण्यात यावीत, असा पक्षातील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर त्यांच्यावर टीका झाली. त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. हे पद अद्याप भरले नाही. मुंबई अध्यक्षपददेखील रिक्त आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदाचा रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे.

राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर….
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी….
आता TMC मध्येच मोठा खेला..! उभी फूट पडणार..? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान….
नाईक कुटुंबियांचा 20 ते 25 कोटी रुपयांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…
सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी., सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य….
‘भारत माता की जय’ बोलू पण, ‘वंदे मातरम्’ नाही, मुस्लिम नेत्याचं वादग्रस्त विधान….
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी..?