धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हावडा :- “पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या खासगी सहायकाच्या हत्येनंतर आता हावड्यात बॉम्बहल्ल्याची घटना समोर आली आहे.
टीएमसी समर्थकांकडून देशी बॉम्ब फेकण्यात आल्याचा आरोप भाजपने केला असून या हल्ल्यात भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. जखमी कार्यकर्त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
हावड्यात भाजप-टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष
गुरुवारी हावड्यातील शिबपूर भागातील चौराबस्ती परिसरात भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर कथितरित्या बॉम्बफेक करण्यात आल्याची माहिती आहे. घटनेनंतर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले.
या हिंसक घटनेमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचा दावा केला असून हल्ल्यामागील कारणांचा तपास सुरू आहे.
पोलिसांचा तपास सुरू
हावडा सिटी पोलीस आयुक्त अखिलेश चतुर्वेदी यांनी या घटनेला राजकीय संघर्ष असल्याचं म्हटलं आहे. ‘शिबपूरच्या चौराबस्ती भागात राजकीय संघर्ष झाला असून त्यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत सहभागी असलेल्या सर्वांना लवकरच अटक केली जाईल,’ असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर सातत्याने हिंसक घटनांच्या बातम्या समोर येत आहेत. भाजप आणि टीएमसी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बंगालमध्ये राजकीय वाद तापला
निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये अनेक भागांत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. शुभेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर आता हावड्यातील बॉम्बहल्ल्यामुळे राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं चित्र आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….