उमरखेड तालुक्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या नागापुर येथे जिल्हाधिकाऱ्याची भेट
कोरोणाच्या पार्श्वभुमीवर , घेतला आढावा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :- तालुक्यातील नागापुर येथील कोरोणा बाधीत रूग्न उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर मृत रूग्नाच्या संपर्कातील हायरीस्क , स्लो रीस्क, आणि लुज कॉन्टॅक्टमधील नागरिकांना कोरोंटाईन करत तात्काळ प्रशासकीय सुत्रे हलवली . याच पार्श्वभुमीवर आज दि. 04 रोजी जिल्हाधिकारी यांनी ग्रामिण भागातील हॉटस्पॉट ठरलेल्या नागापुर येथे भेट दिली. असुन स्थानिक परिस्थीतीचा आढावा घेतला. उमरखेड तालुक्यातील नागापुर येथील मृत कोरोणाबाधीत महिलेच्या संपर्कात हायरीस्क मधील प्रथमच ग्रामिण भागात 16 जन पॉजीटिव्ह आल्याने जिल्हयात एकच खळबळ उडाली. नागापुर सारख्या लोकसंख्येने लहान असलेल्या गावात मुंबईवरून आलेल्या महिलेने सातव्या दिवशी विलगीकरण कक्षाच्या बाहेर निघाल्यामुळे, ग्रामिण भागातील कोरोणा पॉजीटिव्ह रूग्नाची संख्या वाढली. हि बाब चिंतनीय असुन कोरोणा बाधित रूग्नाच्या संपर्कात आलेल्या व संशयीत व्यक्तीना ताब्यात घेऊन त्यांची चाचनी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी एम. डी. सींह यांनी केल्या. व स्थानिक नागापुर येथे संपुर्ण गावाची माहिती घेऊन घरोघरी जाऊन गावाची पाहनी केली व मृत महिलेच्या संपर्कातील 100 नागरिकांना जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये आज रात्रीच भरती करण्याचे आदेश दिलेत*, जेणेकरून येणाऱ्या काळात कोरोणा रूग्न संख्येत वाढ होता कामा नाही , करीता प्रशासनास भेटीदरम्यान सुचना देण्यात आल्या. राज्याच्या रेडझोन मध्ये आलेल्या नागरीकांनी स्वेच्छेने गृहहविलगीकरणात राहावे असे मत व्यक्त केले. यावेळी , जिल्हाधिकारी एम. डी. सींह, जिल्हापोलीस अधिक्षक एम . राजकुमार, मुख्य कार्यपालन अधिकारी जलदजी शर्मा, जिल्हाअरोग्यअधिकारी, बाळासाहेब चव्हाण , उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, अतीरीक्त उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड अनुराग जैन , तहसीलदार रूपेश खंदाडे, तालुका वैधकीय अधिकारी, बी. डी. ओ. जयश्री वाघमारे, जि. प. सदस्य चितांगराव कदम , ठाणेदार कैलास भगत , सरपंच सविताताई कदम व अन्य प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.