उमरखेड तालुक्यातील मोठी बातमी .. बिटरगाव येथे ७ वर्षीय बालकाचा कोयत्याने वार करून खुन ;
चुलत काका अटकेत ; काकुलाही केले केले जखमी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
प्रशांत भागवत
उमरखेड :
रोजमजुरी करीत असतांना माझ्यापेक्षा चांगला राहतो . माझ्यावर करणी केली या संशयावरून चुलतभावावरील राग मनात धरून चुलतकाकाने ७ वर्षीय पुतण्यावर कोयत्याने वार करुन त्याचा खुन केला तर मधस्थीसाठी धावलेल्या काकुवरही कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना आज ( ता. ४ ) रोजी दुपारी २ वाजता दरम्यान तालूक्यातील बिटरगाव येथे घडली .
गणेश ( सदगुरु ) नथु पेलेवाड ( ७ ) असे मृतकाचे नाव असून अंजनाबाई सटवा पेलेवाड ( ६२ ) असे गंभीर जखमी असलेल्या काकुचे नाव आहे .
नथु पेलेवाड व आरोपी किसन शेषेराव पेलेवाड हे दोघे चुलतभाऊ शेजारी राहतात . दोघेही रोजमजुरीचे काम करतात मात्र नथु हा आपल्यापेक्षा चांगला राहतो त्याने माझ्यावर करणी केली असा संशय मनात झाल्याने आज त्याने घरी नथू नसतांना कोयता हातात घेवुन रागाच्या भरात घरात असलेला पुतण्या गणेश याच्या कानावर कोयत्याने वार करून त्याला ठार केले तर मधस्थी करण्यासाठी धावलेली मृतक गणेशची आजी व आरोपीची काकु अंजनाबाई ही च्यावरही पोटावर कोयत्याने वार करुन तीला गंभीर जखमी केले . तिच्यावर उपचार सुरु असून ती गंभीर अवस्थेत आहे .
घटना घडल्यानंतर आरोपी कीसन स्वतःची नस कापुन पोलीस ठाण्यात हजर झाला . या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण करीत आहेत .