आर्णी जवळ एसटी बस – टीप्पर चा भीषण अपघात ; चार मजुर ठार ; १५ गंभीर जखमी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
यवतमाळ / आर्णी :
भल्या पहाटे स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बस चा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आर्णी तालुक्यात कोळवण गावाजवळ पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. सोलापूरहून स्थलांतरित मजुरांना घेऊन ही एसटी बस झारखंडला जात होती अशी माहिती समोर आली आहे.
एसटी बसने मागच्या बाजूने टीप्परला जोरदार धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये एसटीच्या पुढच्या भाग चकानाचुर झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी डंपरच्या फेऱ्या सुरु असतात. या अपघाताने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातच औरंगाबादमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताची आठवण झाली. औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांचा मृत्यू झाला होता.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….