भाजपतर्फे आजपासून ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यातील विशेषत: मुंबईतील करोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून निष्क्रिय झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केले. महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मुख्यमंत्री तसेच राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना भेटून निवेदन देणार आहेत. तर २२ मे रोजी लाखो कार्यकर्ते आपल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करतीलइतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यानेही रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर,कामगार व श्रमिकांसाठी स्वतंत्रपणे पॅकेज जाहीर करावे, ही पक्षाची प्रमुख मागणी आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….