होम क्वॉरंटाइन शिक्का असलेल्या व्यक्तीचा पुसदमध्ये संशयास्पद मृत्यु
पुसद : तालुक्याच्या हुडी गावातील होम क्वारंटाईन असलेल्या ५२ वर्षीय इसमाचा मंगळवारी दुपारी पुसद येथे संशयास्पद स्थितीत मृत्यदेह आढळून आला आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. चार दिवसांपूर्वी सदर व्यक्ती पत्नीसह अहमदनगर जिल्ह्यातील नारायणगाव येथून चार दिवसांपूर्वी हुडी गावात आला होता. तो येहळा शेतशिवारात मुक्कामी होता. या दाम्पत्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का आहे. गावातील लोकांनी त्यांना पुसद येथे आरोग्य तपासणीसाठी जाण्यास सांगितले. हे जोडपे हुडी गावातून सात किलोमीटर दूर पुसदलाही मंगळवारी दुपारी पायदळच दवाखान्यात गेले. तेथून परत गावी जात असताना सायंकाळी लक्ष्मीनगरातील एका दवाखान्याजवळ गेले असता या क्वारंटाईन व्यक्तीला अचानक अस्वस्थ वाटले.
डॉक्टरविना रुग्णवाहिका, उपविभागीय अधिकारी संतापले
क्वारंटाईन व्यक्तीबाबत आरोग्य विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच रुग्णवाहिका तेथे दाखल झाली. परंतु त्यात डॉक्टर नसल्याने पुसदचे एसडीओ डॉ. व्यंकट राठोड चांगलेच संतापले. अखेर डॉक्टर असलेल्या एसडीओंनी स्वत:च सदर व्यक्तीची तपासणी केली. तेव्हा ते मृत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी बीडीओ शिवाजी गवळी, तहसीलदार वैशाख वाहूरवार यांनीही भेटी दिल्या. आरोग्य विभागाला माहिती देऊनही एकही डॉक्टर लगेच हजर न झाल्याने सुमारे दोन तास मृतदेह रस्त्यावरच पडून होता. वृत्तलिहिस्तोवर कुणीही डॉक्टर पोहोचले नव्हते. या मृतदेहाला कुणीही हात लावायला तयार नाही. त्यासाठी आवश्यक पीपीई किट नगरपरिषदेकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….