हिंगोलीमधील परप्रांतीय मजुरांचा लखनऊ पर्यंतचा मार्ग मोकळा; खासदार हेमंत पाटील यांनी केली व्यवस्था
रियाज पारेख ९६३७८८६७७७
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
यवतमाळ (महागाव) :
मागील दोन महिन्यापासून अडकून पडलेल्या हिंगोली,नांदेड, जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारी स्पेशल रेल्वे आज ता.१३ मे,रोजी रवाना झाली आहे. हे मजुर त्यांच्या घरी गावी पोहचले पाहिजेत हीच निस्वार्थ भावना या सर्व प्रयत्नांमागे आहे . अशी भावना खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली . याकामी रेल्वे विभाग , पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने सर्वोतोपरी मदत केली.
उत्तर प्रदेश मधून मजुरीसाठी नांदेड जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा येथे आलेले मजूर लॉकडाउनमुळे मागील दोन महिन्यापासून अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होते . तसेच नांदेड हिंगोली जिल्हाधिकार्याकडे याबाबत मागणी करून स्पेशल रेल्वे सोडण्यासाठी चाचपणी केली होती जिल्हा प्रशासनाने याकामी सर्व यंत्रणा कामाला लावून मजुरांची नाव नोंदणी करण्यात येवून त्यांना फ्री पास ची व्यवस्था करून देण्यात आली . तब्बल १५०० च्या वर मजुरांना घेवून आज ही रेल्वे उत्तर प्रदेश साठी रवाना झाली . यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी आपली भावना व्यक्त करतांना म्हणाले की, कामाच्या शोधात परप्रांतीय मजूर महाराष्ट्रातील अनेक भागात अडकून पडले आहेत हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात मजूर होते . लॉक डाउनमुळे त्यांचे काम बंद झाले होते. उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला होता . त्यामुळे या मजुरांना त्यांच्या घरी गावी जाण्यासाठी रेल्वे विभाग यांच्यासोबत चर्चा करून जाण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी लोक डाउनमुळे मोलमजुरी करणारा कामगार हताश झाला असून बाहेर राज्यात कामामुळे आलेल्या लोकांना आता घराची ओढ लागली होती त्यामुळे अश्या परिस्थितीत प्रत्येकजण आपल्या घरी गावी जावा ही निस्वार्थ भावना या सर्व प्रयत्नांमागे आहे . राजकारणा च्या पलीकडे जावून सुद्धा आपण काही काम करू शकतो याची प्रचिती आज आली आहे .शिवसेनेची बांधणीच ८० टक्के समाजकारण आणि २० राजकारण असल्यामुळे सर्व सामान्याप्रती तळमळ सदैव मनात कायम आहे . त्याच भावनेतून आजवर कार्य करत आलो आहे असेही ते म्हणाले. खासदार हेमंत पाटील यांच्यावतीने
यावेळी हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि औंढा येथील मजुरांना भोजन आणि पास काढून देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. व सर्वांना शुभेछ्या दिल्या यावेळी मजुरांनी खासदार हेमंत पाटील यांच्या बद्दल कृतज्ञता भाव व्यक्त केला.