पॉलिटिक्स स्पेशल ऑनलाईन पोर्टल चा शुभारंभ
वाचकांना मिळणार मोबाईलवर ताज्या बातम्या
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अब्दुल रहेमान चव्हाण :, 9657176148
पुसद :
अल्पावधीत वृत्तपत्र क्षेत्रात भरारी घेणाऱ्या पॉलिटिक्स स्पेशल वृत्तपत्र डिजिटल करण्यात आला आहे.वाचकाचा प्रतिसाद पाहता ताज्या बातम्या पाहण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले.या ऑनलाईन न्यूज पोर्टल चा शुभारंभ आज १ मे रोजी महाराष्ट्र दीनाच्या दिवशी पुसद येथील पॉलिटिक्स स्पेशल कार्यालयात पॉलिटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक रितेश पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
पॉलिटिक्स स्पेशल हे विदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र आहे . वाचकांची संख्या अधिक आहे.त्यामुळे ताज्या बातम्या मिळण्यासाठी पॉलिटिक्स स्पेशल टीम ला वाचकांनी अनेक आपल्या दिलखुलास प्रतिक्रिया दिल्यात.त्यामध्ये ताज्या बातम्या वाचकापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्याय म्हणून जलद बातमी पॉलिटिक्स स्पेशलच्या वाचकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.पॉलिटिक्स स्पेशल ला वाचकांचा आमाप प्रतिसाद पाहता पॉलिटिक्स स्पेशल ने नव्याने सुरू केलेल्या ऑनलाईन पोर्टल ला सुध्दा सहकार्य करावे असे आवाहन पॉलिटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक रितेश पुरोहित यांनी केले आहे. सोबतच नेहमी प्रमाणे पॉलिटिक्स स्पेशल पेपर दर सोमवारी येणार आहे. व तो वाचकाना अंक घरपोच व आपल्या प्रतिष्ठान मध्ये नेहमी प्रमाणे मिळणार आहे.ऑनलाईन पोर्टल हे पॉलिटिक्स स्पेशल चे ताज्या बातम्या तत्कला वाचकाना मिळावी यासाठी तयार करण्यात आला आहे. याची नोंद वाचकांनी व पॉलिटिक्स स्पेशल च्या चाहत्यानी याची नोंद घ्यावी अशी माहिती पॉलिटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक रितेश पुरोहित यांनी दिली आहे.
पोर्टल शुभारंभ प्रसंगी पॉलिटिक्स स्पेशल चे कार्यकारी संपादक उत्तम वानखेडे,के.जी.चव्हाण, प्रशांत भागवत, विजय बोंपिलवार, पुरुषोत्तम कुडवे,अब्दुल रहेमान,रियाज पारेख उपस्थित होते.