पत्रकारांची होणार कोरोना चाचणी
विदर्भ वतन / नागपूर : मुंबई येथील ५३ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने प्रसार माध्यम क्षेत्रात काम करणा-या प्रतिनिधींना कोविड-१९चा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील पत्रकारांसाठी कोरोनाची विशेष चाचणी घेतली जाणार असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगीतले.
महापौरांच्या पुढाकारातून शहरातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींची कोरोना चाचणी २१ आणि २२ एप्रिलला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घेण्यात येणार आहे. मंगळवारी २१ एप्रिलला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींची सकाळी ९.३० वाजता तर बुधवारी २२ एप्रिलला प्रिंट मीडियाच्या फिल्डवर काम करणा-या प्रतिनिधींची चाचणीही सकाळी ९.३० वाजतापासून करण्यात येणार आहे. नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील पत्रकार दिवस रात्र कार्य करीत आहेत. सर्वत्र कोरोनाचा धोका असतानाही हे प्रतिनिधी जीवाची पर्वा न करता अनेक ठिकाणी जाउन जनतेपर्यंत अचूक माहिती पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य करीत आहेत. अशा स्थितीत त्यांनाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या फिल्डवर काम करणा-या प्रतिनिधींनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो हॉस्पीटल) जाउन ही चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

पाणीपुरवठा सभापती होताना उमाने घेतला आपल्याच नगरसेवकाचा बळी ; “शिकारे ची केली शिकार”
शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात भाऊंची अकरा लाखांची दहीहंडी छम छमा छम
विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका..? काय म्हणाले अजित पवार….
प्रणिती शिंदेंविरोधात ठाकरे गट खवळला ; “आमच्या पाठीत खंजीर खुपसला, यापुढे…”
‘त्या’ दिवशी आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार ; संजय राऊतांचं मोठं विधान….
उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….