हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती वसंत उद्यानात साजरी ; वंचितच्या कार्याची अखेर दखल..! प्रशासनाने केली परिसराची साफसफाई….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आज दिनांक 1 जुलै 2023 रोजी काकडदाती परिसरातील वसंत उद्यान येथे हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की पुसद ते कळमनुरी रोडवरील वसंत उद्यान हे ओसाड दुर्लक्षित झालेले उद्यान होते या ठिकाणी मागील आठवड्यात वंचित बहुजन आघाडी याच्या वतीने या उद्यानाचीपाहणी करून परिसराची डागडुजी व सौंदर्यकरण करा या मथळ्याखाली निवेदन
देण्यात आले होते.तसेच रिपब्लिकन वार्ता न्यूज चॅनेलने ही बातमी प्रसारित करून या विषयाला उजाळा देण्यात आला होता.या निवेदनाचे प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केल्याने
अखेर यश प्राप्त झाले आहे. थोड्या प्रमाणात का होईना हा परिसर आज रोजी साफसफाई करून वापरास अनुकूल करण्यात आला आहे.
पुढील काळात प्रशासकीय लेव्हलवर उपविभागीय अधिकारी पुसद यांनी पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन
मोठा निधी उपलब्ध करू व वसंत उद्यान परिसराचे सौंदर्यकरण करण्यात येणार असल्याच्या पाठपुराव्याचे सहपत्र वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या तालुका कार्यालयास देण्यात आले आहे.त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तथा विविध सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक यांनी एक प्रकारे आनंद व्यक्त केला आहे.
प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर
आज दिनांक 1 जुलै 2023 रोजी वसंत उद्यान येथील वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तसेच महानायकाच्या जयंती दिनानिमित्त या परिसरात वृक्षारोपण करून जयंती दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, जिल्हा उपाध्यक्ष शामराव राठोड,भीम आर्मीचे अशोक भालेराव रिपब्लिकन वार्ता चे पत्रकार राजेश ढोले, तालुका उपाध्यक्ष कृष्णा दोडके, शहर महासचिव अरुण राऊत, शहर उपाध्यक्ष राजरत्न लोखंडे, शहर उपाध्यक्ष प्रसाद खंदारे, राहुल धुळे, सिद्धार्थ बर्डे, शुभम खंदारे ,वैभव सूर्यवंशी ,किसन ताळीकोटे ,सचिन राऊत,आशिष सूर्यवंशी, किरण सूर्यवंशी, भूषण जोगदंडे, अमोल जाधव, कपिल हनवते, धम्मदीप चौधरी, वैभव धुळे इत्यादी सहित कार्यकर्ता पदाधिकारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.