अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अभिनेता, लेखक, दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांचे आज सकाळी 10 च्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
त्यांनी अनेक नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं. क्षितीज झारापकर यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं. ते चर्चा तर होणारच या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते.
क्षितीज झारापकर यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाचा सामना करत होते. मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डर झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचे पार्थिव दादर शिवाजी पार्क येथील त्यांच्या घरात अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3.30 च्या सुमारा त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येतील.
क्षितीज झारापकर हे अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक होते. 2019 मध्ये रिलीज झालेल्या हुतात्मा या वेब सीरिजमध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाण यांची भूमिका साकारली होती.
क्षितीज झारापकर यांनी ‘या’ चित्रपटात केलं काम
ठेंगा, गोळा बेरीज, आयडियाची कल्पना, एकुलती एक, बायकोच्या नकळत या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. तसेच त्यांचे चर्चा तर होणारच हे नाटक देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या नाटकात क्षितीज यांच्यासोबतच अदिती सारंगधर आणि आस्ताद काळे यांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या.