‘करोना’ची भीतीने बॉयलर, कॉकरेल शंभररूपयात तीन
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
गोंदिया/ भंडारा – मागील पंधरवड्यापासून कोरोना संसर्गामुळे संपूर्ण जग धास्तावला आहे. त्यातच या विषाणूची लागण चिकनमुळे होत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्याने चिकन खरेदीकडे ग्राहक फिरकेनासा झाला आहे. पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडला असून दारोदारी कोंबड्या नेऊन विकाव्या लागत आहेत. दोन दिवसांपासून भंडाऱ्यात मालवाहू गाड्यांमध्ये ‘ बॉयलर, कॉकरेल शंभररूपयात तीन’ अशा आरोळ्या देऊन चिकनची विक्री केली जात होती. इतके दर घसरविल्यानंतरही चिकन खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे.
कोरोना संसर्गामुळे हजारो लोकांना लागण झाली आहे. भंडारा जिल्ह्यात या संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तरीसुद्धा नागरिक दहशतीत आहेत. अनेक जण तोंडावर मास्क लावून फिरत आहेत. त्यातच काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोरोनाचा संसर्ग चिकन खाल्ल्यामुळे होत असल्याच्या अफवा पसरविल्या जात असल्याने खवय्यांनी चिकन खरेदीकडे पाठ फिरविली आहे. चिकनच्या दुकांनावरील गर्दी नाहिशी झाली आहे. या अफवांमुळे चिकन व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. सर्व चिकन व्यावसायिकांची भिस्त होळीच्या शिमग्यावर होती. परंतु, खवय्यांच्या मनावर ‘करोना’ची भीती कायम असल्याने होळीच्या सणामध्येही चिकनसाठी ग्राहक सापडेनासा झाला आहे.
यावर उपाय म्हणून चिकन व्यावसायिकांनी चिकनचे दर कमी करून विक्री सुरू केली. त्यासाठी बॉयलर, कॉकरेल कोंबड्यांना मालवाहू गाडीमध्ये टाकून गल्लोगल्ली विक्री करण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून भंडाऱ्यातील गल्लीबोळात ‘बायलर, कॉकरेल सौ रुपये में तीन’ अशा हाका मारून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. १०० ते १८० रुपये प्रती किलोच्या कोंबड्या आता १०० रुपयांमध्ये तीन याप्रमाणे विकल्या जात असल्या तरी ग्राहक मिळत नाही. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडला असून व्यावसायिक देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे
भंडारा जिल्ह्यात सुमारे ३०० पोल्ट्री व्यावसायिक आहेत. त्यातील अनेकांनी बँकेतून कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आहे. या कोंबड्यांसाठी दररोज खाद्य, औषधींवर खर्च केला जातो. परंतु, आता कोंबड्यांची मागणी ठप्प पडल्याने त्यांच्यासाठीचा खर्च व्यावसायिकांना परवडेनासा झाला आहे. दरवर्षी होळीमध्ये सर्वाधिक चिकनची मागणी होत असते. यंदाच्या होळीत ही मागणी बंद झाली आहे. चिकनऐवजी खवय्यांचा कल मटनाकडे आहे.

पाणीपुरवठा सभापती होताना उमाने घेतला आपल्याच नगरसेवकाचा बळी ; “शिकारे ची केली शिकार”
शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात भाऊंची अकरा लाखांची दहीहंडी छम छमा छम
विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका..? काय म्हणाले अजित पवार….
प्रणिती शिंदेंविरोधात ठाकरे गट खवळला ; “आमच्या पाठीत खंजीर खुपसला, यापुढे…”
‘त्या’ दिवशी आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार ; संजय राऊतांचं मोठं विधान….
सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..