विद्यार्थीना क्रीडा गणवेश वाटप ; ग्रामीण पत्रकार संघाचे सर्वत्र कौतुक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :- मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून स्व. पी.एल. शिरसाठ प्रणित ग्रामीण पत्रकार संघ दिग्रस च्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तालुक्यातील पेळू येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश,बुक,पेन व खाऊचे वाटप करून पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर व सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक रमेश उडाखे, वसंता राठोड, अरुण चिद्दरवार यांनी प्रथम पत्रकार दिनी सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडा वार, तर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुनिता भड, आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी स्व. पी.एल. शिरसाठ प्रणित ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष लुकमान खान, उपाध्यक्ष पुरुषोत्तम कुडवे, विलास निकम, प्रफुल व्यवहारे,लक्ष्मण टेकाळे, प्रा.सैय्यद मोहसीन,राजपाल बनसोड,साजिद पतलेवाले,रामदास मागूळकर,सुनील साबळे,सदानंद जाधव,अजीत महिंद्रे,पंकज चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चिद्दरवार यांनी केले तर आभार उडाखे यांनी मानले.
पत्रकार हा समाजांचा आरसा आहे.
गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार
समाजातील चांगल्या,वाईट घटनांचे चित्र तो वृत्तपत्रातून मांडीत असतो दुर्लक्षित असलेले अनेक प्रश्न आपल्या लेखणीचे माध्यमातून प्रशासनाला जागे ठेवण्याचे कामही पत्रकार नेहमी करीत असून तो समाजाचा आरसा आहे. असे मत दिग्रस पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार यांनी आपले अध्यक्षीय भाषणातुन व्यक्त केले व यावेळी सर्व पत्रकाराणा शुभेच्छा देण्यात आल्या.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….