कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत, शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्यांना निवडणुकीत प्रत्यय येईल ; शरद पवारांचा सूचक इशारा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यामधील सत्तासंघर्षात शिवसेनेत दोन गट पडले असले, तरी कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्यांना निवडणुकीत प्रत्यय येईल, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
शरद पवार आज कोल्हापुरात बोलताना म्हणाले की, शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्यांना निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल. मी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात फिरलो आहे, फिरत आहे, कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे. येत्या निवडणुकीत जनताच सर्वांना जागा दाखवेल. त्यावेळी जनतेच्या भावना काय आहेत हे समजतील. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही अंतर्गत वाद नाहीत. परंतु, आमच्यात मतभेद सुरू असतील तर ते आम्ही बैठक घेवून सोडवू.
छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’च
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक संबोधल्यानंतर राज्यभर आंदोलन करत भाजपने संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होतेच, पण ते धर्मवीरही होते असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात भूमिका स्पष्ट केली. पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’च असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणून यामध्ये काहीही चुकीचे नाही. संभाजी महाराज यांनी स्वराज्यावर आलेले अनेक हल्ले परतवून लावले आहेत.
सत्ता हातात आली की जमिनीला पाय ठेवून वागायचं असतं, पण आता सत्ता आल्यानंतर असं वागत नाहीत. काही नेत्यांनी टोकाची भूमिका घेतली हे योग्य नाही, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना पवार यांनी राज्यपालांना टोला लगावला. राज्यपाल इथं नाखूष असतील, तर आम्ही देखील त्यांच्याबद्दल नाखूष आहोत. पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्यावर सातत्याने टीका होते, जनता टीका करते.
नितीशकुमार यांनी घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो
दरम्यान, बिहारमध्ये सुरु असलेल्या जातीय जणगणनेवरून शरद पवारांनी स्वागत केले. जातीआधारीत जनगणनेची मागणी आम्ही देखील अनेक वर्षांपासून केली आहे, लहान लहान घटक आहेत त्यांची मोजमाप व्हावीत. नितीशकुमार यांनी घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. राहुल गांधी यांच्या संदर्भात काही पक्षांनी टीका टिंगलटवाळणी केली गेली. राहुल गांधी यांनी एका पक्षापुरते आपला कार्यक्रम ठेवला नाही, त्यामुळे त्यामध्ये सर्वसामान्य, विविध पक्षाचे कार्यकर्ते नेते त्याच्या सोबत सहभागी झाल्याचे दिसून आलं. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा फायदा होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….