माणुसकीची भिंत पुसद कडून नव्या पद्धतीने “अन्नदान सेवा” उपक्रम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “अन्नदान श्रेष्ठदान” आपल्या भारतात सर्व संत व समाज सुधारकांनी अन्नदानाचे महत्त्व पटवून दिले आहे.
म्हणतात ना, एकदा रक्त देऊन पहा व अन्नदान करून पहा, रक्तदान केल्यानेच पुन्हा रक्त चोवीस तासात पूर्ववत होते. आज आपण मुलांनाही दररोज शिकवतो की, भारत माझा देश आहे.. सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग हे बेघर मनोरुग्ण आणि गरजवंत यांच्यासाठी माननीय गजानन जाधव माणुसकीची भिंतीचे अध्यक्ष यांना ही एक कल्पना सुचली की,पोटाला पोटभर खायला द्या पण पोटावर बांधून देऊ नका.. यामुळे अनेक समस्या सुटतील, हा विचार करून या अन्नदान सेवा या उपक्रमाची सुरुवात अन्नदात्यांच्या व शुभचिंतकाच्या मदतीने पुसद मध्ये सुरू करण्यात आली आहे. पुसद मधील कोणीही मनोरुग्ण,बेघर व गरजू रात्री उपाशी राहू नये, या उदात्त हेतूने अन्नदान सेवा हा नवीन उपक्रम माणुसकीची भिंत सदस्याकडून सुरू करण्यात आला. माणुसकीची भिंत सदस्यांनी दररोज सायंकाळी सात वाजता उपजिल्हा रुग्णालय पुसद पासून महात्मा ज्योतिबा फुले चौक, शनी मंदिरा समोरुन वसंतराव नाईक चौक,मुखरे चौक,बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चंद्र बोस चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुसद बस स्थानक या रोडवरील मनोरुग्ण,बेघर व गरजूंना मोफत पोळी व बेसनचे अन्नदान सेवा देणारा फिरता ऑटो सुरू केला आहे.पत्रकार दिनानिमित्त असलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते फित कापून ऑटोचे उद्घाटन करण्यात आले, या प्रसंगी अध्यक्षस्थानी शेतीनिष्ठ शेतकरी श्री दत्तात्रय जाधव व प्रमुख पाहुणे माननीय Adv.श्री आशिषभाऊ देशमुख माजी अध्यक्ष बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा मुंबई,आगार व्यवस्थापक पुसद श्री अभिजीत कोरटकर,सप्त खंजिरी वादक श्री पंकजपाल महाराज,ज्येष्ठ पत्रकार के.जी. चव्हाण सर,अध्यक्ष तालुका पत्रकार संघ अनिल चेंडकाळे,दिनकर गुल्हाने,ललित सेता, दीपक हरीमकर सर्व पत्रकार बंधू,माणुसकीच्या भिंतीचे मार्गदर्शक परशराम नरवाडे माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव, संतोष गावंडे,सोहम नरवाडे,अनंता चतुर,शिवराम शेटे,पंजाबराव ढेकळे, देवानंद निळकंठ,प्रभाकर पाटील, धनंजय आघाम व दीपक घाडगे व पुसद मधील इतर मान्यवर उपस्थित होते.
माणुसकीची भिंत ही अन्नदाते व शुभचिंतकाच्या मदतीने अन्नदान सेवेचा वसा सुरू ठेवत आहे व हा एक नवीन अन्नदान सेवेचा शुभारंभ आम्ही आपल्याच प्रेरणेतून सुरू करत आहोत. विशेष म्हणजे हा अन्नदान सेवेचा रथ (ऑटो) माननीय संतोष भाऊ गावंडे यांनी उपलब्ध करून दिलेला आहे, आम्ही तुमच्या मदतीने हा उपक्रम सुरू करीत आहोत कारण आपणच आमचे ऊर्जास्थान आहात, उपक्रमासाठी जमेल तशी मदत करावी असे आव्हान अध्यक्ष गजानन जाधव यांनी केले आहे.