TET घोटाळा..! मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश, विरोधकांनी मुद्दा ताणला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षेतील टीईटी गैरप्रकाराचा मुद्दा आज विधानसभेत चर्चेत आला. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा विषय चर्चेत आणणा याची मागणी केली.
परंतु हा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने यावर चर्चा करता येणार नाही. असं सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सांगितलं. त्यावरून सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला.
सुरूवातीलाच अजित पवार यांनी हा मुद्दा उचलून धरला. यावर आपण चर्चा करायला हवी. परंतु त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देतांना हा प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना यावर चर्चा करता येणार नाही. असं सांगितलं. त्यानंतर हा प्रश्न विधानसभेच्या कामकाजात राखून ठेवावा, अशी मागणी लगेचच राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी केली. त्यावर थोडा गोंधळ झाला.
त्यावर लगेचच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही बाजूंच्या मताशी सहमतीने हा विषय राखून ठेवला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. टीईटी घोटाळ्यात, मंत्री, आमदार, अधिकारी यांची मुल नातेवाईक याबाबत विरोधकांनी प्रश्न विचारले. त्यावर सरकारने उत्तर देण्याचं टाळलं. त्यावरून थोडा गोंधळ झाला.
मागील काही महिन्यात टीईटी परिक्षेत गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार ७ हजार ८७४ उमेदवारांची टीईटीची प्रमाणपत्रे रद्द करण्यासासह त्यांना पुढील टीईटी परिक्षा देण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यात आला. त्यावरून प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यावरून आज विधानसभेत विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….