राज्यसभा निवडणुकांची तारीख जाहीर ; 6 राज्यांतील 57 जागांवर होणार निवडणूक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने गुरुवारी केली.
15 राज्यांमधून निवडून आलेल्या राज्य सभेच्या 57 सदस्यांचा कार्यकाळ जून-ऑगस्ट 2022 दरम्यान संपणार आहे. 10 जून रोजी निवडणूक होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
15 राज्यांमध्ये असलेल्या राज्यसभेच्या 52 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. सर्वाधिक 11 जागा उत्तर प्रदेशात आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. प्रत्येक राज्यात प्रत्येकी सहा जागांसाठी निवडणूक होत आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, बिहार, झारखंड आणि हरियाणा या राज्यांमध्येही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा देशभरात राजकीय घुसळन होणार हे निश्चित.
दरम्यान, गेल्या महिन्यात, द्वैवार्षिक निवडणुकांनंतर संसदेच्या वरच्या सभागृहात भाजपने 100 चा आकडा पार केला, 1990 हा आकडा पार करणारा पहिला पक्ष ठरला आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…