गेल्या 24 तासात सहा पॉझिटिव्ह ; 70 कोरोनामुक्त ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1747 बेड उपलब्ध ; ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 104
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 20 फेब्रुवारी :- गेल्या 24 तासात जिल्ह्यात सहा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 70 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 98 व बाहेर जिल्ह्यात 6 अशी एकूण 104 झाली आहे. त्यातील 12 रूग्ण रूग्णालयात तर 92 गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 895 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी सहा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 889 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79017 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 77111 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1802 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या सहा रूग्णांमध्ये 3 महिला व 3 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील एक, महागाव एक, नेर दोन, उमरखेड एक व यवतमाळ येथील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 37 हजार 468 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख 58 हजार 415 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.44 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.67 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1747 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 19 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1747 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 19 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 768 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी पुर्ण 857 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….