मुख्यमंत्र्यांच्या भेंटी नंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भेंट घेतली शरद पवारांची…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. दरम्यान, या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर केसीआर म्हणाले, देशातील राजकारण आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरच्या स्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी मी महाराष्ट्रात आलोय. उद्धव ठाकरेंशी बोलून प्रसन्न वाटलं. अनेक मुद्यांवर चर्चा झाली आणि सहमतीही झाली. देशात सुधारणा आणण्यासाठी, देशाचा विकास करण्यासाठी चर्चा झाली. बऱ्यापैकी सर्व विषयांवर ही चर्चा झाली. येत्या काही दिवसांत आम्ही हैद्राबादमध्येही भेटू. महाराष्ट्र सरकारच्या सहकाऱ्यानं अनेक गोष्टी आमच्यासाठी सुकर झालेल्या आहेत. त्यामुळे ही दोस्ती निभवायची आहे.
आज एक सुरुवात झालीये आणि आम्ही थेट स्पष्टपणे सांगितलंय. आम्ही इतर नेत्यांशीही खुलेपणाने बोलू. कशाप्रकारे तिसऱ्या आघाडीची सुरुवात होईल, याबाबत आम्ही चर्चा करु. अत्यंत वाईट पद्धतीने केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहेत, यात काही शंकाच नाही. मात्र, केंद्र सरकारला ही नीती बदलावी लागेल, अन्यथा त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय, असंही यावेळी केसीआर यांनी म्हटलं.

दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले, “संपूर्ण देशात राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरलेत. तेलंगणा-महाराष्ट्राची सीमा हजार किमीची असल्यानं आम्ही सख्खे शेजारी आहोत. नाहीतर प्रत्येकजण एक काहीतरी इरादा घेऊन पुढे चाललाय. राज्य गेलं खड्यात, देश गेला खड्ड्यात, अशी सध्या स्थिती आहे. आता देशात नव्या विचारांची सुरुवात झाली आहे. हा विचार पुढे न्यायाला थोडा वेळ लागेल आणि प्रयत्नांची एकदा सुरुवात केल्यानंतर मेहनत तर करावी लागणार. शेवटी देशाचे मुलभूत प्रश्नांना हात घालण्याऐवजी दुसऱ्याला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. तुम्ही नाही केलं हे देखील खोट्या पद्धतीनं सांगायचा कारभार मोडायला पाहिजे”

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….