गेल्या 24 तासात सहा पॉझिटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1768 बेड उपलब्ध….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 02 जानेवारी :- गेल्या 24 तासात जिल्ह्यात सहा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या निरंक आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 13 व बाहेर जिल्ह्यात दोन अशी एकूण 15 झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 868 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी सहा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 862 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बाभुळगाव येथील दोन, पांढरकवडा येथील एक, यवतमाळ येथील दोन व बाहेर जिल्ह्यातील एक रुग्ण असून त्यात तीन पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72989 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71186 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 86 हजार 382 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 13 हजार 296 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.28 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.69 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1768 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1768 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 786 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.