बीड जिल्हा परिषद निवडणूकीची रणधुमाळी ; मुंडे भावंडांची प्रतिष्ठा पणाला…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असतं. बीडमध्येही सध्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे भावंडांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भाजपने यासाठी मोर्चेबांधणीही सुरु केली आहे. तसेच महाविकास आघाडीतर्फेही कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. बीड जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांमधील थेट निवडणूक मानली जाते, आता जिल्हा परिषद निवडणुकीकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात
जिल्हा परिषद निवडणुकी साठी भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झालीय. मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात भटके विमुक्तांची संख्या मोठी आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीसह महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपकडून मोठे पाऊल उचलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने भटके विमुक्त आघाडी युवा मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षपदी सतीश भोसले यांची निवड करण्यात आलीय. सतीश भोसले यांच्या निवडीमुळे भाजपचे पारडे जड झाले असून त्यांच्या निवडीचे बीड जिल्ह्यातून स्वागत होत आहे.
मुंडे भावंडांची प्रतिष्ठा पणाला..
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीतील मंत्री धनंजय मुंडे या भावंडांत खरी लढत होणार आहे. 2015-16 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने जिल्हा परिषदेवर झेंडा रोवला होता. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर झाले आणि जिल्हा परिषद महाविकास आघाडी म्हणजे धनंजय मुंडेंच्या ताब्यात आली. आता दोन्हीही भावंडांचे लक्ष जिल्हा परिषद निवडणुकीकडे लागले आहे.
सर्वपक्षीय नेत्यांची तयारी सुरु
मिनी विधानसभा म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीकडे पाहिले जाते. जिल्हा परिषद ताब्यात आल्यानंतर विधानसभा निवडणुका लढण्यास सहज होते. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांकडून मोठी ताकत लावली जातेय. येत्या फेब्रुवारी मध्ये जिल्हा परिषद निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. त्याआधीच बीडमध्ये भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आलीय.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..