लग्न ठरलं सुपर स्प्रेडर ; नवरीच पॉझिटिव्ह ; मंत्र्यांसह राज्यपालांची ही उपस्थिती होती…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीच्या लग्नात राज्यातील नेते, मंत्री यांच्यासह राज्यपालही उपस्थित होते. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी आणि ठाकरे घराण्याची नववधू अंकिता पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवरून दिली आहे. अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांचे लग्न मंगळवारी पार पडले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनेक नेत्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे , हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे.
आता अंकिता पाटील यांनी ट्विटरवर आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलं.
हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिताचे लग्न निहार ठाकरे याच्यासोबत झाले आहे. निहार हा बिंधुमाधव ठाकरे यांचा मुलगा आहे. या लग्नाला मंत्री,राज्यपाल अनेकांनी उपस्थिती लावली होती.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….